मलकापूर विधानसभा क्षेत्रामध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मंजूर करा- आमदार राजेश एकडे.

0

मलकापूर, प्रतिनिधी  

राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंत  हे शनिवार दिनांक १०  जुलै २०२१ रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार  राजेश एकडे  यांनी त्यांची  मलकापूर येथील शासकीय विश्रामगृह मध्ये भेट घेऊन त्यांचे मतदार संघात प्रथम आगमन प्रसंगी स्वागत करून  मलकापूर  क्षेत्रामध्ये शासकीय  तंत्रनिकेतन महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी केली.

मलकापूर विधानसभा क्षेत्रांमध्ये  मलकापूर शहरात, मलकापूर तालुक्यातील तसेच नांदुरा शहर,नांदुरा तालुक्यातील  मोठ्या प्रमाणात हुशार,गुणवत्ताधारक विद्यार्थी-विद्यार्थिनी आहे.  मुलांच्या उच्च शिक्षणासाठी  मलकापूर, नांदुरा येथे  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नसल्याने या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना  प्रवेश मिळाल्यास खामगाव किंवा जिल्ह्याबाहेर इतर ठिकाणी  शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा लागतो.

परीणामी त्यांना व त्यांच्या पालकांना  आर्थिक  प्रश्नासमोर  सामोरे जावे लागते. मलकापूर विधानसभा क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी उच्च शिक्षणाची तंत्र शिक्षणाची सोय व्हावी या अनुषंगाने  मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश एकडे यांनी  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  मा.ना.श्री. उदयजी सामंत  यांना मलकापूर विधानसभा क्षेत्रांमध्ये  शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय  मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

मा.मंत्री महोदय यांनी सदर बाबत शासकीय तंत्र निकेतन संस्था खामगावच्या प्राचार्याकडून माहिती तथा आढावा घेऊन  याबाबत मलकापूर येथे  शासकीय तंत्रनिकेतन  महाविद्यालय  मंजूर करण्याबाबत अंशतः सहमती दर्शवली. यावेळी माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे राज्य उपाध्यक्ष हाजी रशीदखां जमादार, मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंडू चौधरी, मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजु पाटील, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशसिंग राजपूत,शिरीष डोरले, प्रा.अनिल खर्चे ,मलकापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड.दिलीप बगाडे, सोशल मीडियाचे  विधानसभा अध्यक्ष समाधान इंगळे सर, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार साबळे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष ईश्वर भदाले प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.