मलकापूरात लक्ष्मीनगर परिसर हादरला राष्ट्रीय महामार्गावर”द बर्नींग ट्रकचा” थरार..!

0

मलकापूरः येथून नजीकच राष्ट्रीय महामार्ग ६ वर आज शनिवारी सायंकाळी “द बर्नींग ट्रकचा” थरार तब्बल ४५ मिनिटे नागरिकांनी अनुभवला. उभ्या ट्रकला अचानक आग लागल्याने नुकसान झाले नाही मात्र पेटलेला उभा ट्रक बघून लक्ष्मी नगरातील नागरिक अक्षरशः हादरले. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,ट्रक क्र.जी.जे.०५/ बी.एक्स.८३६८ सुरत वरुन कलकत्त्याला प्लास्टिक दाणा घेवून जात होता.

आज शनिवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ६ वर चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात हि बाब आल्यानंतर त्याने लक्ष्मी नगराजवळ ट्रक उभा केला. हा प्रकार समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. मात्र क्षणार्धात टायर फुटल्याने नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळापळ केली. तब्बल ३० मिनिटे नागरिकांनी “द बर्नींग ट्रकचा” थरार अनुभवला. त्यानंतर पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग शमली. या घटनेत सुदैवाने जिवीत हाणी टळली मात्र उभ्या ट्रकला बघून लक्ष्मी नगरातील नागपूर अक्षरशः हादरले.! या घटनेत काही काळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून वाहतुक सुरळीतपणे केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.