मन सुन्न करणारी धक्कादायक घटना ; बेड न मिळाल्यामुळे पतीने पत्नीच्या मांडीवरच सोडले प्राण

0

नाशिक : राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे बेड न मिळाल्यामुळे  एका तरुणाने नाशिकमधील रुग्णालयाच्या दारातच प्राण सोडले. मन सुन्न करणारी ही धक्कादायक घटना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात घडली आहे. पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीने अखेरचा श्वास घेतल्याने उपस्थितांचेही काळीज पिळवटून निघाले.

अरुण माळी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरुणला त्रास होऊ लागल्यानंतर पत्नी सुरेखा त्याला घेऊन रुग्णालयात आली होती. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन चेक केले. अरुणच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाली होती. त्यामुळे उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.