मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून द्यावा

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :– मुक्ताईनगर येथे काँग्रेस कमिटीचे जिल्हा प्रवक्ता एडवोकेट अरविंद गोसावी यांनी मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांना मुक्ताईनगर तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देऊन केली आहे.

संपूर्ण देशासह आपले महाराष्ट्रात गेल्या तीन चार महिन्यापासून कोरोना चा धुमाकुळ सुरू असून जनता हवालदिल झाली आहे. आपल्या नेतृत्वाखाली संपूर्ण सरकार नियोजनबद्धरीत्या तयारीने या संकटाचा सामना करीत असून सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शक्य ती मदत करीत आहे. तरी देखील प्रामुख्याने मजूर आणि कामगार वर्ग यांचे वर व त्यांचे कुटुंबीयांवर हालाखीची वेळ आलेली असून प्रसंगी त्यांना उपासमारीला देखील तोंड द्यावे लागत आहे. रोजगारासाठी मोठ्या शहरात गेलेल्या कामगारांचे मूळगावी पुनाराआगमन झालेले आहे त्यांचा जळगाव जिल्हा मुक्ताईनगर तालुक्यावर परिणाम झालेला आहे कारण त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे.

या भीषण परिस्थितीत तालुक्यातील जनतेचे व कामगार आणि मजूर वर्ग व त्यांच्या कुटुंबीयांचे जगणे सुकर होण्यासाठी त्यांच्या हाताला काम व कष्टाला दाम मिळणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आमची सविनय मागणी आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या सर्वांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी माननीय श्री योगेन्द्र जी पाटील समन्वयक उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटी माननीय श्री संदीप भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यांचे नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पाठपुरावा करीत आहेत.

मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा प्रवक्ता एडवोकेट अरविंद गोसावी, काँग्रेस कमिटीचे मागास विभाग जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. गवई, अरुण कांडेलकर व इतर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.