मध्य रेल्वेचे महाअधिक्षक संजीव मित्तलांनी खंडव्यासह बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकाची केली पाहणी

0

खंडव्यात टीटी व लोकोपायलट लॉबीचे उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी)-  मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल हे शुक्रवार २७ रोजी  भुसावळ दौर्यावर आले आहे. पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास त्यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक पाचवर आगमन झाले.

यावेळी भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यानी स्वागत केले . त्यानंतर डीआरएम स्पेशल ट्रेन खंडव्याकडे रवाना झाली. खंडवा रेल्वे स्थानकावरील टीटी लॉबीसह लोकोपायलट लॉबीचे त्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले .तसेच नवीन पुलाचे निरीक्षण केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्यांचे उद्घाटन केले तसेच राजभाषा व सुरक्षा व अन्य विभागातर्फे आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. जीएम दुपारी बर्हाणपूरकडे मार्गस्थ. दरम्यान बर्हाणपूर रेल्वे स्थानकाच्या पाहणीसह प्रवाशांशी  त्यांनी  संवाद साधला व  प्रवाशांच्या अडी-अडचणी त्यांनी  जाणून घेतल्या.

जीएम दौऱ्यात या अधिकाऱ्यांचा सहभाग

जीएम दौर्यात डीआरएम विवेककुमार गुप्ता, सिनी.डीसीएम आर.के.शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच अन्य अधिकार्यांचा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.