अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी दर्शवले एकात्मतेचे दर्शन

0

भुसावळ (प्रतिनिधी)-येथील दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सांगता निमित्त वरणगाव शहरातून दिंडी महोत्सव काढून विविध झाकयांमधून विविधतेचे व एकात्मतेचे दर्शन घडविले.

स्वातंत्र्यपूर्व काळात 1944 ला ग्रामीण भागातल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे याकरिता वरणगाव एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करण्यात आली होती या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले व आज ते देश सेवेसह विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहे आज पर्यंत शाळेने घडवलेल्या व चांगले संस्कार रुजलेल्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ज्ञान दिंडी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या ज्ञानू दिंडीचे उद्घाटन पदवीधर आमदार सुधीर तांबे आमदार संजय सावकारे वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय  संदीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  संस्थेचे शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे अध्यक्षा वंदना पाटील उपाध्यक्ष कमलाकर चौधरी सचिव चंद्रशेखर झोपे सहसचिव संजय ढाके सदस्य गोविंद मांडवगणे जनार्दन पाटील कैलास माळी मधुकर पाटील राजेंद्र चौधरी रवी कोल्हे संजय झोपे सुभाष सराफ दीपक मराठे सुधाकर जावळे नीळकंठ सरोदे मुख्याध्यापक आर ए वाघ आदी उपस्थित होते या दिंडीमध्ये महाराष्ट्राची परंपरा असलेले मावळे ग्रंथ दिंडी संस्थेसाठी योगदान दिलेल्या माजी संस्थापक यांचे देखावे स्त्री शिक्षण महाराष्ट्रातील संतांचे जिवंत देखावे राष्ट्रीय नेते भारत माता आपला पोशिंदा शेतकरी यासह देशातील जाती धर्मातील प्रांतातील वेशभूषा  यांचे देखावे दाखवून  एकात्मतेचे दर्शन घडविले आहे या मिरवणुकीत लेझीम व बँड पथक आपली चुणूक दाखवली असून मिरवणूक महात्मा गांधी विद्यालय पासून सुरू होऊन प्रभात फेरी मार्गाने बस स्थानक भोगावती नदी पोस्ट गल्ली चौधरी वाडा गांधी चौक या मार्गाने महात्मा गांधी विद्यालयात विसर्जन होणार आहे या

शनिवारी या कार्यक्रमाचा समारोप होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे असतील तर खा रक्षा खडसे आ संजय सावकारे आ शिरीष चौधरी आ चंद्रकांत पाटील पदवीधर आ सुधीर तांबे शिक्षक आ किशोर दराडे शिक्षणाधिकारी बि जे पाटील उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण आदी उपस्थित राहणार आहे यावेळी 1944 मधील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करणार आहे

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक माजी संस्थाचालक शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दि वरणगाव एज्युकेशन संस्थेचे संचालक मंडळ व विद्यार्थी कृती समितीने केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.