मद्यधुंद कंटेनर चालकाचा थरारक…नेरी ते जळगावदरम्यान तब्‍बल पन्नास वाहने उडवली

0

जळगाव : मलकापूर येथे केमिकलचा माल खाली करून मुंबईकडे परतणाऱ्या मद्यधुंद कंटेनर चालकाने आपल्‍या धुंदीत सुसाटपणे कंटेनर चालवत त्‍याने तब्‍बल पन्नास वाहनांना धडक दिली. त्यात एका जणाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना नेरी ते जळगावदरम्यान घडली आहे. भाऊसाहेब खांडवे (वय ३९, रा. कर्हे वडगाव ता. आष्टी जि. बीड) असे या कंटेनर चालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर असे की, मलकापूरमध्ये कंटेनर (एमएच २३, एयु ४४३३) हा कंटेनर मुंबईकडे जात होता. यावेळी नेरी ते जळगाव शहर दरम्यान  भरधाव कंटेनर चालकाने महामार्गावर काही वाहनांना धडक दिली असता तो न थांबताच सुसाट निघाला होता. त्यात कंटेनर चालकाने वाहने तब्‍बल पन्नास वाहनांना उडविल्याचा थरारक घटना घडली. दरम्‍यान संबंधित वाहनचालक त्‍याचा पाठलाग करत होते; यामुळे भीतीने कंटेनर चालकाने कंटेनर अधिक भरधाव वेगाने पळविला. मद्याच्या नशेत असलेल्या या चालकाने रस्त्यात समोर येणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिल्‍याचे सांगण्यात येत आहे. यात एक दुचाकीस्वार ठार झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, शहरातील रहदारीच्या मार्गावरून कंटेनर घालत चालकाने अजिंठा चौफुली, चित्रा चौक, टॉवर चौक मार्गे कंटेनर रेल्वे स्टेशन समोर थांबविला. दरम्‍यान त्याच्या मागावर असलेल्या नागरिकांनी त्‍याला लागलीच पकडून चांगलाच चोप दिला. घडलेल्‍या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्‍या पोलिसांनी चालक खांडवे यास ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले.

Leave A Reply

Your email address will not be published.