‘मदतीचा एक घास’ जिल्हा महिला काँग्रेस कडून राबवण्यात येणार उपक्रम

0

अमळनेर(प्रतिनिधी) ; महिला या संवेदनशील असतात, त्यांना परिस्थिती अधिक चांगली समजून घेता येते. त्यांना सर्वांच्या पोटाची चिंता असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या वतीने ‘एक हात मदतीचा’ हा स्तुत्य उपक्रम जिल्ह्यात देखील राबवण्यात येणार आहे.

त्यासंदर्भात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला काँग्रेसच्या प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, व महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला.

घरच्या गृहिणी घरी रोज स्वयंपाक करत असतात, त्याच स्वयंपाकात प्रत्येक महिला काँग्रेस कार्यकर्त्याने आठ ते दहा लोकांचा अधिक स्वयंपाक करून हा डब्बा गरजू लोकांना पोचवावे, हा उद्देश या उपक्रमाचा असून त्या साठी एक केंद्र तयार करून सर्व जमलेले डब्बे गरजू लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.’

‘या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवण मिळेल आणि राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा घडून येईल’ असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी या वेळी आयोजित झूम मिटींग मध्ये केले. या मिटिंग मध्ये महिलांच्या अनेक प्रश्नवर चर्चा करण्यात आली.या वेळी प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी  ‘शिवभोजन थाळी केंद्र महिलांना मिळावे,त्याबोतच महिलांना स्वयंरोजगार मिळाले पाहिजे, महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारावे अशा मागण्या सरकारकडे करणार असल्याची माहिती सर्व महिलांना दिली.

या मिटींगला जळगाव जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ उपस्थित होत्या.जळगाव जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचा त्यांचा मानस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.