भुसावळ, दि. 13 –
मला बदनाम करण्यासाठी मंत्र्यांचा हात असून त्यांनीच हे षडयंत्र रचले असून यात कुणाचीही गय करणार नाही, मला त्रास देणार्यांना धडा शिकविणार असल्याची भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया यांच्यासह सहा जणांवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. माझ्या नावाचे खोट धनादेश तयार करून बँकेत दिले. सर्वोच्च न्यायालयाची देखील अंजली दमानिया यांनी फसवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये माझ्या परिवारावर झालेल्या अन्याया यामागे कोणकोण आहेत याचा शोध घेतला असून त्यांना धडा शिकविणार असल्याचेही ते म्हणाले.