सातबाऱ्यावरील बोजा कमी करून देण्यासाठी तलाठ्याने मागितली चार हजारांची लाच

0

जळगाव ;- सातबाऱ्यावरील बोजा कमी करून देण्याच्या मागणीसाठी यावल तालुक्यातील कोरपवली येथील तलाठ्याला चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली असून हेमंत पांडुरंग जोशी ,वय-32, तलाठी कोरपावली,अति.यावल असे तलाठ्याने नाव आहे . जळगावचे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक जी.एम. ठाकुर आणि सहकाऱयांनी हि कारवाई केली . तक्रारदार यांनी आयडीबीआय बँक यावल येथून घेतलेले कर्ज फेडले असुन शेतीवर असलेला सदर कर्ज बोझा 7/12 उताऱ्यावरून कमी करण्याच्या मोबादल्यात तलाठी जोशी यांनी तक्रारदार यांचेकडे ४ हजार लाचेची मागणी केल्याने त्यांना आज सापळा रचून अटक करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.