भोळे महाविद्यालयात मराठी भाषा दिवस साजरा

0

भुसावळ (प्रतिनिधी )– येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमानिमित्त प्रा डॉ संजय बाविस्कर, प्रा डॉ जगदिश चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमा दरम्यान प्रा डॉ दयाघन राणे यांनी मराठी राजभाषा दिवस चे उद्दीष्ट स्पष्ट करून त्यांच्या होस्टेलर्स  या मराठी काव्य संग्रह च्या प्रकाशन समारभा संदर्भातील साहित्यिक वि वा शिरवाडकर आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या कविता संग्रहामधील काही कविता सादर करीत असताना त्या कवितांची पार्श्वभूमी विशद केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ भारती बेंडालें यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयामधील बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.