नाहाटा महाविद्यालयात भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

0

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात भूगोलशास्त्र मंडळ आयोजित भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न. या अंतर्गत २७ फेब्रुवारी रोजी भारत सरकारच्या भू वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेतील निलेन्द्र कुमार ( वरिष्ठ संशोधक),अतुल कुमार (सहाय्यक संशोधक) यांची भू वैज्ञानिक सर्वेक्षण व त्याचा शासकीय कल्पांमधील सहभाग या विषयावर व्याख्यान आयोजित केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व कार्यशाळेचे उद्घाटक मा. उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी हे होते. यावेळी आपल्या विषयाचे विवेचन करतांना सुरुवातीला अतुल कुमार यांनी सांगितले की भूगर्भशास्त्र म्हणजे काय, भूगर्भशास्त्रात कोण कोणत्या विषयाचा समावेश होतो, याचा अभ्यास करतांना कोण कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, तसेच या भू वैज्ञानिक संस्थेची स्थापना कशी झाली व या संस्थेचे कार्य काय काय आहेत या विषयीची माहिती दिली. तसेच ही संस्था सुमारे १७५ वर्षापासून कार्य करत असून ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची जुनी सर्वेक्षण संस्था आहे. या शिवाय भूवैज्ञानिक सर्व्ह करतांना भुगर्भातील हालचालींचे किती सुक्ष्म निरीक्षण करावे लागते व हे निरीक्षण करतांना कोण कोणती काळजी घ्यावी लागते या विषयीची विस्तृत माहिती दिली. मा. निलेन्द्र कुमार यांनी आपल्या विषयाचे विवेचन करतांना महाराष्टात या भ वैज्ञानिक सर्वेक्षणाचे कार्यालय कोठे कोठे आहे तसेच या क्षेत्रात रोजगार कसा उपलब्ध करावा व भू वैज्ञानिक सर्वेक्षण करतांना नकाशाचे वाचन कसे करावे व नकाशाची मदत कशी घ्यावी या विषयीची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेत असतांना भू गर्भाचा अभ्यास कसा करावा या विषयीची विस्तृत माहिती दिली. खडक कसा तयार होतो, खडकामध्ये मातीचे कोणते गुणधर्म असतात व खडकांचा अभ्यास करतांना कोणती काळजी घ्यावी याविषयी देखील मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. गोस्वामी यांनी असे आवाहन की संशोधक तयार होण्यासाठी तसेच संशोधन वृतीला चालना देण्यासाठी आपलं महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. म्हणून अशा विविध संधींचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. भूगोल विभागाने अशा कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल भूगोल विभागाचे कौतुक केले. दरम्यान  २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता भूगोल विभागातील २० विद्यार्थी व ४ शिक्षक हे साकेगाव वाघुर नदी पात्रातील ज्वालामुखीय तसेच इतर खडकांच्या प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी त्याच प्रमाणे यावल येथे दख्खन तील अंतरंगाची रचना यांचा अभ्यास करण्यासाठी गेले. संपूर्ण दिवसभर विदयार्थ्यांनी कुतुहलात्मक व संशोधक वृतीने भूगर्भाचा व त्यातील विविध घटनांचा अभ्यास केला. व तेथील संशोधकांना प्रश्न देखील विचारले. त्यांनी देखील प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली.. ही संपूर्ण कार्यशाळा प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे आणि उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली तर या कार्यशाळेसाठी भारत सरकारच्या भू वैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेचे सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. व्ही. पी. लढे आणि सूत्रसंचालन प्रा. अनिल हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत पाटील, प्रा. अजय तायडे यांनी आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. मिनाक्षी बेदरकर यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.