भुसावळ शहर महिला पर्यावरण सखी मंचची ऑनलाईन झूम मीटिंग संपन्न

0

भुसावळ (प्रतिनिधी) -भुसावळ शहर महिला पर्यावरण सखी मंचची नुकतीच ऑनलाईन झूम मीटिंग संपन्न झाली .या मिटिंग मध्ये सतरा सखींनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रत्येकीने आपण करत असलेल्या कार्याची माहिती व परिचय करून दिला.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न मीटिंग मध्ये वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी कामाचे स्वरूप व त्याबाबत महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सगळ्यांना कार्याची दिशा समजली. त्याचप्रमाणे राज्य समन्वयक नाना पाटील यांनीही कार्याची दिशा काय असावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष सौ. नयना पाटील यांनी आपल्या जिल्ह्याच्या कार्याबद्दल आढावा घेतला तर कार्याध्यक्ष सौ. मनीषा पाटील यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला त्याच बरोबर भुसावळ शहराध्यक्ष शालिनीताई वाडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून झूम मिटींगचे नियोजन अतिशय व्यवस्थित रित्या केले.

प्रसंगी ज्येष्ठ सल्लागार श्रीमती सुनंदा ताई औंधकर यांनी अनुभव कथन केले आरती चौधरी, आरती देशपांडे स्वाती भोळे, रीता नाईक, विद्या पाटील,शितल अरोडा, सारिका फालक, ॲड.जास्वंदी भंडारी ,सुनंदा भारुडे, सरोज कवीश्वर, सरिता चौक, विजया पाटील व अन्य सखी उपस्थीत होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.