पहूर परिसरात गावठी दारू जोमात

0

जामनेर : तालुक्याती पहूर तसेच परिसरात गावठी दारूचे फुगे जोरात सुरू असून पहूर पोलिस सोईस्कर रित्या दुर्लक्ष करतांना दिसत आहे पोलिसांना माहीत असूनही कानाडोळा करून अवैध धंद्याना पाठबळ देत असल्याचे समजत आहे, तसेच पहूर गावाच्या आजूबाजूला खेड्या पाड्या वर गावठी दारूचे प्रमाण दिवसान दिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहे आणि तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललीआहे, वारंवार या गावठी दारू च्या बातम्या प्रसिद्ध करूनही याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

तसेच पुढाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावठी दारूचे प्रमाण वाढले आहे, तसेच परिसरातील पिंपळगाव कमानी, या ठिकाणी देखील गावठी दारू जोरात सुरु आहे, येथून दारूबंदीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील पहूर पोलिस स्टेशनला गेल्या काही दिवसांपूर्वी दिला असून सुद्धा यावर काहीही फरक पडत नसल्याचे स्पष्ट होत आहे, तरी महोदय एस .पी.प्रविण मुंडे साहेबांनी ल़ंक्ष द्यावे अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.