जळगाव जिल्ह्यात आज नव्या बधितांपेक्षा बरे होणारे दुप्पट

0

जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थितीत आता सुधारू लागली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या बाधित रुग्णापेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक असल्याने जिल्ह्याला दिलासा देणारी बाब आहे. आज शनिवारी दिवसभरात ४०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ ताझाला.९ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरवातीलाच रुग्ण संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात आज आढळून आलेल्या रुग्ण संख्येनंतर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ९५१ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख २७ हजार १६७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्‍थितीला ८ हजार ३०६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव रूग्‍णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २४७८ वर गेला आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-३१, अमळनेर-२३, चोपडा-३६, पाचोरा-२८, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-२२, एरंडोल-२५, जामनेर-४८, रावेर-३१, पारोळा-१७, चाळीसगाव-५५, मुक्ताईनगर-१६, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यात १०

Leave A Reply

Your email address will not be published.