भुसावळ रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांतर्फे मॉकड्रिल

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्थानक जंक्शन स्थानक असल्याने चारही बाजूने य्या ठिकाणी प्रवाश्यांची वर्दळ सुरु असते ओघाने गुन्हेगार व गुन्हेगारी वृत्त्तीचे लोक याचा ग़ैरफ़ायदा घेतात, याच अनुषंघाने शहरातील राजकीय पार्श्वभूमिवर अतिसंवेदनशील आहे, एवढेच नव्हे तर तालुका व शहरात  दीपनगर औष्णीक विद्युत प्रकल्प, आर्मीचे आर्टिलरी सेंटर , रेल्वे प्रशिक्षण  स्कूल (झेडटींसी)  ,वरणगाव -भूसावळ, ऑर्डनन्स फॅक्टरी, हतनुर धरण यासह सर्व धर्मिय विविध धार्मिक स्थळे आहेत .त्या ठिकाणची सुरक्षा विभागाचे महत्त्वाचे काम आहे. समाजातील शांतता अबाधित राहावी आतंकवादी हल्ले होवू नये अथवा असे हल्ले टाळण्यासाठी तसेच अश्या प्रकारचे  दुष्कृत्य हाणून पाडण्यासाठी तसेच येवू घेतलेल्या निवडणुका आदी पार्श्वभूमिवर पोलिस यंत्रणा अलर्ट आहे किंवा नाही कीती सज्ज आहे याची चाचणी व सराव परीक्षा म्हणून पोलीस प्रशासना मार्फत शनिवार १९ रोजी रेल्वे स्थानकात मॉकड्रिल घेण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

शनिवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकात अचानक मोट्ठा ब्लास्ट झाल्याचा आवाज आला व एकच धावपळ झाली. कोणतीही घटना घडली नसून ही रंगीत तालीम असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शनाखाली भूसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ,शहर पोलोस ठाण्याचे बाबासाहेब ठोम्बे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

ब्लास्ट झाल्याची जाणीव झाल्याने अवघ्या क्षणात परिसरातील नागरिक भयभीत झाले होते . मात्र पोलिसांनी परिस्थिती कशी हाताळावी याचे प्रात्यक्षिक करीत नियंत्रण स्थिती काबूत आणली. पोलिस यंत्रणा कीती ‘अलर्ट ‘ ?  आहे म्हणून घेतलेल्या परीक्षेत पोलिस पास  झाले.

मॉकड्रिल दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर बेवारस बॅगमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तू तसेच आतकंवाद्यांनी नागरीकांनी ओलीस ठेवण्याची माहिती बाजारपेठ व शहर पोलिसांनी नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर घटनास्थळी तगडा पोलिस ताफा पोहोचला. ओलीस धरुन ठेवलेल्या नागरीकांची सुटका, आतंकवाद्यांना अटक व बॉम्बसदृष्य वस्तूचा शोध असे पोलिसांची मॉकड्रिल  घेण्यात आले.

यातून भुसावळ पोलिसांचे प्रसंगावधान व सुसज्जता तपासण्यात आली. सुरक्षा व्यवस्था तसेच अनुचित प्रकार घडल्यास पोलिस दल सज्ज आहे किंवा नाही? यादृष्टीने अचानक चाचपणीसाठी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी मॉकड्रिल घेतले.

भुसावळ रेल्वे स्टेशनवर एक बेवारस बॅग असून त्या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आहे. तसेच दहशतवादी शिरल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार तात्काळ सर्व पोलिस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले. स्थानिक पोलिसांशिवाय शिघ्र कृती दल व बॉम्बशोधक पथकाची देखील गरज आहे, याची खात्री पटल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस मुख्यालय जळगाव या ठिकाणावरून या दोन्ही पथकांची मागणी केली. काही वेळातच सदरची पथके त्या ठिकाणी पोहोचले. सर्वप्रथम शिघ्र कृतीदल पथकाने दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी नागरीकांना ओलीस ठेवले आहेत, त्या ठिकाणाची माहिती घेतली व तत्काळ अतिशय शिस्तबद्ध कारवाई करून सदर ओलीस ठेवलेल्या इसमांची सुटका केली.

दरम्यानच्या काळामध्ये तेथे असलेल्या पोलिस अंमलदारांनी तसेच आरसीपी पथकाने संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य केला. त्यानंतर एक-एक साहित्याच्या साहाय्याने रेल्वे स्टेशन पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेली बेवारस बॅग चेक केली. बॉम्बशोधक पथका कडील डॉगने देखील सहभाग घेतला. बेवारस बॅग शोधून बॉम्ब सदृश्य वस्तू डिफ्युज करण्यात आली. हे सर्व नाट्यमय प्रकार पोलिसांची सुसज्जता, तत्परता तपासणीसाठी करण्यात आली. या सर्व घटामोंडींमुळे मात्र शहरात नेमके काय सुरु आहे, पोलिसांची इतका मोठा ताफा याबाबत चर्चा रंगली हेाती.

आगामी काळातील सणउत्सव, निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पोलिस दले सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरही  पोलिसांकडून दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला. सरावात पोलीस स्टेशन बाजारपेठ, पोलीस स्टेशन भुसावळ शहर, पोलिस स्टेशन भुसावळ तालुका, नशिराबाद, शहर वाहतूक शाखा त्याचप्रमाणे पोलिसांकडील असे आरसीपी पथक इत्यादी सामील झाले होते.

दंगाकाबू सरावाच्या दरम्यान पोलिसांकडील हत्यारे देखील तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे लाठीचा वापर, अश्रुधुराचा वापर कसा करावा याबाबत देखील प्रात्यक्षिक घेण्यात आले.त्यावेळी उपविभागीय अधिकारी  वाघचौरे यांनी गॅस गन चा वापर करून सराव केला. पोलिस दल सर्व आवश्यक त्या उपकरणांसह सज्ज असल्याचा सज्ज असल्याचे या प्रात्याक्षिकातून समोर आले. या दोन्ही सराव व मॉकड्रिलमध्ये बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, मंगेश गोंटला, साहाय्यक पोलीस निरीक्षक दुनगुहू, चव्हाण, व या सर्व पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार सामील झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.