चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिसमध्ये विशेष टपाल शिक्क्याचे अनावरण

0

चाळीसगाव:- येथील हेड पोस्ट ऑफिस मध्ये जागतिक योग दिन दिनानिमित्त दिनांक 21 तारखेला संपूर्ण भारतामध्ये आठशे ठिकाणी एकाच वेळी विशेष तिकिटाचे शिक्क्याचे अनावरण होणार आहे यावेळी चाळीसगाव हेड पोस्ट ऑफिस मध्ये  21 जून रोजी येणाऱ्या सर्व टपालावर या विशेष शिक याने टपाल छायांकित केला जाणार आहे या तिकीटावर आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 ग्राफिकल डिझाईन्स विशेष संकेत करण्यात आलेले आहेत व हे कॅन्सल झालेली टिकीट पुन्हा वापरले जाणार नाही कारण यामुळे तिकीटाचा पुन्हा पुन्हा वापर टाळला  जातो असे शिक्के म्हणजे मौल्यवान संग्रह आणि फिलेटेलिक अभ्यासा करणाऱ्यांसाठी  एक अत्यंत दुर्मिळ असा प्रकार आहे.

ज्यांना तिकीट संकलनाची  आवड आहे अशांसाठी ही एक पर्वणीच आहे असे तिकीट  संकलन करणाऱ्या ज्यांना आवड आहे त्यांनी कोणतीही पोस्ट ऑफिसात दोनशे रुपयांनी खाते उघडून नवनवीन प्रकारचे फिलेटेलिक ब्युरो मार्फत आलेले तिकिटे जमा करू शकतो.

आंतरराष्ट्रीय योग दिन दिवस गेल्या सहा वर्षभरात जगभरात अनेकदा असे सर्जनशील प्रकारे साजरा केला जात आहे भारतात अशा सुंदर योग दिनाच्या दिवशी अनोख्या उत्सवाचे चित्रण केले जाते यामध्ये भारतीय सैन्य कर्मचारी अधिकारी आयएनएस विराट योग करणारे कॅंडिडेट वाळू शिल्प इत्यादी योगासने करणारे भारतीय नौदलाचे अधिकारी यांचा समावेश असतो

यावर्षी covid-19 रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्व प्रोग्राम आभासी म्हणजेच ऑनलाइन घेतले जाणार आहे या तिकिटाचे 800 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी कॅन्सलेशन होणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.