भुसावळ येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोन संशयित ताब्यात

0

भुसावळ:- शहरातील माजी नगरसेवकासह एकाची  हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे वेगात फिरवित दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून आणखी उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बुधवार 29 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील मरी माता मंदिराजवळ चार चाकी वाहनाने जाणारे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे जात असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवित त्यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्याची घटना घडली होती या घटनेमुळे भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला संतोष बारसे यांचे लहान बंधू मिथुन बारसे यांनी फिर्याद दिल्यावरून दहा  ते बारा जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

मिथुन बारसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माजी नगरसेवक राजू सुर्यवंशी, शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडीत, टकरन पथरोड, नितीन पथरोड, बंटी पथरोड यांच्यासह २-३ अनोळखी संशयतांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हल्लेखोर आरोपींना शोधण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा संशयीतांच्या मागावर असल्याने त्यांचा कसून शोध सुरू होता. यातील संशयित  राजू सूर्यवंशी हा कारने गुजरात राज्यात पळून जात असताना साक्री येथील  एका हॉटेलवरून धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले  उद्या शुक्रवारी भुसावळ येथे संशयित राजू सूर्यवंशी याला आणण्यात येणार आहे. तसेच संशयित विनोद चावरिया याला भुसावळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतले

याबाबत पोलीस हत्याकांड प्रकरणी संशयीत आरोपींचा शोध घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.