भुसावळ न्यायालयात १६५ वकील व कर्मचारी यांचे लसीकरण

0

भुसावळ | प्रतिनिधी 

भुसावळ येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.     जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार न्यायालयातील कर्मचारी वकील यांना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला या शिबिरात 165 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या परवानगीने लसीकरण शिबिर घेण्यात आले. प्राथमिक स्वरुपात एका लाभार्थ्याला लस देऊन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.   यावेळी जिल्हा न्यायाधीश एस. बी भंसाळी  दिवाणी न्यायाधीश  वरिष्ठ स्तर व्हि .जी चौखुंडे, प्रथमवर्ग न्यायाधीश श्री.के . एस  खंडारे, प्राथमिक वर्ग न्यायाधीश ॲड.  डी. बी डोमाळे , वकील संघाचे अध्यक्ष ॲड. तुषार पाटील , महिला प्रतिनिधी ॲड. जास्वंदी एन्.भंडारी , ॲड. दीपक पाटील, ॲड. विश्वंभर  वाणी , ॲड. पुरुषोत्तम पाटील, ॲड धनराज मगर व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर व डॉ. तैसिफ खान यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम यशस्वी झाली  म्हणून वकील संघाकडून त्यांचे ऋण निर्देश करण्यात आले.    शिबिराचे यशस्वीतेसाठी राधा पाटील, सुनिता चित्ते सुमित सपकाळे, हेमलता चौधरी, साजिद शहा, मीरा गळवे , ॲड. जास्वंदी भंडारी, पटवारी नाना ,अन्सारी, तसेच कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले व सर्व वकील व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.