भुसावळात 19 रोजी स्वामी नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा संपन्न !

0

आकर्षक मिरवणुकीने वेधले शहरवासियांचे लक्ष

भुसावळ (प्रतिनिधी)- अनंत विभूषीत जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा व प्रवचनाचे  आयोजन भुसावळात आज 19 रोज करण्यात आले होते . सुरभी नगरातील संतोषी माता हॉल जवळच्या प्रशस्त अशा पटांगणावर मंगळवार रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले

लक्षवेधी शोभायात्रा

यानिमित्त मंगळवार, 19 रोजी सकाळी आठ वाजता जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिरापासून पादुकांची शोभायात्रा प्रवचन स्थळापर्यंत काढण्यात आली .शोभा यात्रेत बग्गी,घोड़ागाड़ी, सह कलशधारी महिला,भजनी मंडळ सहभागी झाले होते .  गुरूंच्या पादुकांचे आगमन झाल्यानंतर गुरूपूजन करण्यात आले  तर गुरूपूजनाची सांगता श्री लिलामृत ग्रंथ पारायणाने करण्यात आली . दुपारी 12 ते 1 दरम्यान श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे ऑनलाईन प्रवचन संपन्न झाले .  भाविकानी अत्यंत शांत चित्ताने ऑनलाइन प्रवचनाचा लाभ घेतला . तसेच  नाणिजधामचे प्रवचनकार यांनीही प्रसंगी  प्रवचन केले

पादुका दर्शन सोहळ्यासाठी खान्देशासह मध्यप्रदेशातून हजारोंवर भाविकानी दर्शनाचा लाभ घेतला .  त्या दृष्टीने आयोजकांनी भव्य मंडप उभारून उत्कृष्ट नियोजन केले होते . भाविकांसाठी महाप्रसाद तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती . यशस्वीतेसाठी जिल्हा निरीक्षक अमोल कुलकर्णी, जिल्हा सेवाध्यक्ष डॉ.नामदेव बोरसे, जिल्हा महिलाप्रमुख विद्या वणीकर, तालुका सेवाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मधुकर जावरे, जिल्हा सचिव शशीकांत राणे, जिल्हा धर्मक्षेत्रप्रमुख डिगंबर राणे तसेच जिल्हा सेवा व सर्व तालुका समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते  यांनी परीश्रम घेतले  .

Leave A Reply

Your email address will not be published.