भुसावळात वारकरी संप्रदाय चाली प्रशिक्षण वर्गास सुरुवात

0
भुसावळ (प्रतिनिधी )-
आपले परीवार सार्वजनिक वाचनालय संचलित संत साहित्य स्नेह मंदिरात वारकरी संप्रदाय
(चाली) प्रशिक्षणाच्या वर्गाचा सुरुवात करण्यात आली सोमवार १७ पासून सुरू झालेल्या वारकरी चाली प्रशिक्षण वर्गात स्वरब्रह्म संगीत क्लासेस च्या माध्यमातून वारकरी सांप्रदायिक चाली तसेच टाळ वादन मृदंग वादन व शास्त्रीय संगीत यासंदर्भात ह.भ.प. दत्तात्रय महाराज साकरीकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वारकरी सांप्रदायिक चालीच्या प्रचार आणि प्रसार व्हावा,नवीन टाळकरी घडावेत हा प्रमुख उद्देश या प्रशिक्षण वर्ग सुरु करण्या पाठीमागचा असल्याचे समन्वयक ह भ प दीपक महाराज शेळगावकर यांनी प्रतिपादन केले. सद्गुरु धनजी महाराज प्रतिमापूजन ,टाळ मृदंग वीणा पूजनाने व दीपप्रज्वलनाने स्वर ब्रह्म संगीत क्लासेस वारकरी चाली प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ह भ प दत्तात्रय महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रसंगी परिसरातील वारकरी सांप्रदायिक भाविक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.