भुसावळात भरदिवसा घरफोडी करून 20 हजाराची रोकड लांबवली

0

गवळीवाड्यातील घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण

भुसावळ  (प्रतिनिधी )- 

शहरातील गवळीवाड्यासारख्या भरवस्तीत चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून 20 हजार रुपयांची रोकड व दोन एटीएम कार्ड लांबवल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गवळी वाडा भागातील मोहम्मद शोएब मोहम्मद सादिक रेल्वेत नोकरीला असून ते सकाळी आठ ते चार वेळेस ड्युटीवर असताना घरी कोणीही नाही, याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 20 हजार रुपये रोकड, दोन एटीएम कार्ड असे चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. शनिवारी मोहम्मद शोएब कामावरून घरी परतल्यावर दरवाजाचा कडीकोडा तुटलेला पाहून चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केलेला आढळला. मोहम्मद शोएब यांनी सुरक्षेच्या दृष्टीने घरात सीसीटिव्ही कॅमेरा बसवले आहेत. चोरट्यांनी हे कॅमेरे देखील चोरुन नेने. यामुळे आता नागरिकांनी अजून कोणती सतर्कता बाळगावी? असा प्रश्न निर्माण होत आहे. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. यावरून अज्ञात चोरट्याचा विरोधात शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मो.वली सैय्यद करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.