भुसावळात खाजगी गाडीत दोन तरुणांसह सापडले इव्हीएम मशीन

0

भुसावळ – भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल जवळील मतदान केंद्र परिसरात एका खाजगी गाडीमध्ये दोन ईव्हीएम मशीन आढळल्याने परिसरात एकच गोंधळ झाल्याची घटना दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास घडली . याप्रकारामुळे काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर केंद्रावर मतदान अचानक संथ गतीने होऊ लागले . घटनास्थळी पोलिसांनी येऊन त्वरित दोघा तरुणांसह ईव्हीएम मशीन व गाडी ताब्यात घेतली असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ श्रीकुमार चिंचकर हे याप्रकरणी चौकशी करीत आहे . गाडी एका बीएलओ ची असल्याची चर्चा होती.

लोकसभा निवडणुकीसाठी भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल जवळील मतदान केंद्राजवळ गाड़ीक्रमांक एमएच १९ बीयु ६२४६ ही गाडी उभी होती या गाडीत दोन ईव्हीएम मशीन असल्याचा संशय पोलिसांना आल्यावरून त्यांनी गाडी मध्ये असलेले दोघा तरुणांना हटकले व चौकशी केली . सदर गाडी हि एका बीएलओ ची असल्याचे समजते . यामुळे या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसात कोणताही गुन्हा दाखल नसून सहाय्य्क निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत चौकशी कर्रित असल्याचे सूत्रांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.