भुसावळात कालिपिली रिक्षा चालक व मालकांवर पोलिसांची कारवाई

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येत्या निवडणुकांचे पार्श्वभूमीवर तसेच सणोत्सावांमध्ये रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील विविध भागांमध्ये बेशिस्त पार्किंग, अवैध प्रवासी वाहतूक, वीना परवाना, यूनिफॉर्म नसणे यासह वाहतुकिंचे नियम मोडणाऱ्या रिक्षा चालक व मालकांवर पोलिसांची करडी नजर वळवली असून याअनुषंगाने उपविभागीय  पोलिस अधिक्षक गजानन राठोड यांच्या उपस्थितीत  कारवाई करण्यात आली.

स्थानिक पांडुरंग टॉकीज परिसरातून ये जा करणाऱ्या या सर्व कालिपिली धारकाची आज बुधवार २ रोजी तपासणी करून चौकशी करण्यात आली. यामध्ये कागदोपत्राची पूर्तता न करणाऱ्या व नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.