भुसावळात कत्तलसाठी आलेल्या गुरांना मिळाले जीवनदान !

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील नसरवानजी फाईल मध्ये बकरी ईद निमित्त कत्तलसाठी आलेल्या 15 गुरांना ( बैल) यांना  पोलिसांनी जीवदान दिल्याची घटना दिनांक 12 ऑगेस्ट 19 रोजी रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान घडली.

रावेर तालुक्यातील सावदा येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या मार्केट मधून बकरी ईदच्या पार्श्वभूमिवर  व्यापाऱ्याने गुरांची भरलेली आयसर वाहन 15 गुर घेऊन भुसावळ कडे रवाना केली असल्याची कुणकुण  बातमीदारा मार्फत पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली त्यावरून पोलिसांनी सापळा रचून जाम मोहल्ला भागातील नसरवानजी फाईल मध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक देविदास पवार,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच पोलिस कर्मचारी चोख बंदोबस्त लावला.

गुरांनी भरलेले वाहन नसरवानजी फाईल मध्ये पुलाच्या बाजूला लावलेले होते .पोलिसांच्या पथकाने या गाडिला पकडले .तेव्हा वाहन सोडून चालक पसार झाला.  गुरांच्या वाहनाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बकरी ईद करिता या गुरांना आणल्यामुळेच पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत सावधानी बाळगुन हाताळले  व गुरांची सुटका केली दरम्यान तीन गुरांना मालवाहू रिक्षेमध्ये भरून बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या बाहेर रिक्षा उभी करण्यात आलेली होती.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 12 बैलांची सुटका केली मात्र ही बैल कुणी व का आणली? याची माहिती पोलिसांना कळू शकली नाही.बाजारपेठ पोलीस स्टेशनला  याबाबत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.सुटका झालेल्या बैलांची जळगावच्या पांझरपोळ येथे रवानगी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.