भुसावळमधील कोरोना सेंटर कार्यान्वित ठेवावे- प्रा धिरज पाटिल

0

भुसावळ – महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना या वैश्विक महामारीला राज्यात नियंत्रित करण्यासाठी यशस्वी नियोजन केले आहे. कोरोना बाधित रुग्णास उपचार त्वरित मिळावे यासाठी ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू केले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्य शासन तयारीत आहे. असे असतांना भुसावळातील काही कोविड सेंटर बंद केले जाणार असल्याचे चर्चेत आहे. कोविड सेंटरमुळे गोरगरीब रुग्णांवर योग्य उपचार झाले. मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड रुग्णालये बंद केली ते ठीक आहे परंतु  भुसावळातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच केंद्रे बंद केल्यास असुविधा होईल. येत्या काही दिवसांत रूग्ण वाढले तर प्रशासनाचीच चिंता वाढेल आणि विपरित परिस्थितीचा सामना करण्यास दमछाक होईल.भुसावळमधील कोरोना सेंटर कार्यान्वित ठेवावे म्हणून प्रा.धिरज पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे केली आहे तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास यांच्याकडेही निवेदन सादर केले आहे. शहर व तालुक्यातील कोविड सेंटर कोरोनाची संभाव्य दुसऱ्या लाटेचे संकट टळल्याशिवाय जनहितासाठी कोविड सेंटर बंद करु नये म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडेही मागणी करू असे प्रा.धिरज पाटील यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.