भालेराव नगरातील समस्यांबाबत नागरिकांनी दिले उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0

अमळनेर (प्रतिनिधी):- भालेराव नगर मधील गट क्रमांक १३९०/२/३ मधील खुला भुखंड (Open Space) रहिवाशांनी लोक सहभाग आणि स्वखर्चाने तारेचे कुंपन करून व्रुक्ष रोपण करून विकसित करण्याचे ठरविले आहे.सदर जागेची साफसफाई करण्यास सुरुवात केली असता गटाच्या पश्चिमेला बांधकाम केलेल्या रहिवाशांनी त्यांचे सांडपाणी आणि शौचालयाचे पाणी मोकळे सोडले आहे.परिणामी परिसरात दुर्गंधी परसत असल्याने आमच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून साथीचे रोग वाढण्याची शक्यता आहे.

हि बाब संबंधितांना निदर्शनास आणून दिली असता त्यांनी  सांडपाण्याची तसेच शौचालयाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यास विरोध केला आहे.म्हणून संबंधित रहिवाशांनी पाण्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी आपल्या स्तरावरून समज द्यावी. अशा आशयाचे निवेदन आज भालेराव नगरातील रहिवाशांनी न.पा.चे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना सादर केले. संबंधित नागरिकांना न.पा.कडून पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी समज देण्यात येईल. असे आश्वासन गायकवाड यांनी दिले.निवेदनावर एम.ए.पाटील, संदीप साळुंखे, डि.जी.पाटील, जितेंद्र चंद्रात्रे,रामकृष्ण पाटील, श्रीराम पाटील, सुर्यकांत बाविस्कर, सुकदेव शिंदे यांच्या सह अन्य रहिवाशाच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.