भार्गव दुसाने एम टी एस परीक्षेत पाचोरा केंद्रात प्रथम..

0

जळगाव दि. १६ (प्रतिनिधी) –
शिंदे इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा विद्यार्थी भार्गव अनिल दुसाने याने इयत्ता तिसरी एम. टी. एस. परीक्षेत पाचोरा तालुक्यातील केंद्रात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत भार्गव अनिल दुसाने याने २०० पैकी १७४ गुण मिळवून पाचोरा केंद्रात प्रथम स्थान मिळविले आहे.
भार्गव च्या यशाबद्दल शिंदे इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा तालुक्यातुन सर्वत्र कौतुक करण्यात आले.
प्राचार्य डॉ विजय पाटील तथा
वर्ग शिक्षक श्रीमती प्रज्ञा मॅडम व सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी भार्गव व त्याच्या पालकांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.