भारत मातेच्या हितासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे सेवाभावी कार्य- गणेश गावित

0

साकळी ता.यावल येथील विभागीय बैठकीत प्रतिपादन

साकळी ता.यावल- वनवासी कल्याण आश्रमचे सेवाभावी कार्य भारत मातेचा हितासाठी सुरू आहे. सेवाभाव ही आपली संस्कृती असून मंदिरे-देवस्थाने ही आपली श्रद्धास्थाने व बलस्थाने आहे. या ठिकाणी जाऊन कल्याण आश्रमाच्या सेवाभाव कार्याची जनजागृती करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रम चे प्रांत संघटन मंत्री गणेश गावित यांनी केले.

साकळी ता.यावल येथे देवगिरी कल्याण आश्रम प्रांत श्रद्धा जागरण यांच्यावतीने दि.२ व ३ रोजी अशा दोन दिवसीय प्रांत बैठकीचे श्री भवानीमाता मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोपाच्या वेळी गावित बोलत होते. यावेळी प्रांत सहश्रद्धा जागरण प्रमुख यशवंत वळवी, पश्चिम क्षेत्र श्रद्धा जागरण प्रमुख गजानन सोलकर, विश्व हिंदू परिषद (देवगिरी प्रांत) पूर्णवेळ कार्यकर्ता धोंडू अण्णा माळी(साकळी), भुसावळ जिल्हा संघटन मंत्री वीरसिंग वसावे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला धुळे, नंदुरबार, भुसावळ, जळगाव ,नांदेड किनवट येथील जवळपास ३५ कार्यकर्ते उपस्थित होते. पहिल्या दिवशी कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. यानंतर भारत माता, भगवान बिरसा मुंडा व वनवासी कल्याण आश्रम चे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर वनवासी कल्याण आश्रम चे सामाजिक कार्य या विषयावर चर्चा यशवंत वळवी यांनी सत्संग कार्यक्रमात केली. तर दुसऱ्या दिवशी दैनंदिन कार्यक्रमानंतर सत्संग केंद्राची रचना कशी असते ? या विषयी माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे आगामी जनगणना कशी असेल व त्यात आपला सहभाग कसा असेल. असे गणेश गावित यांनी समारोपप्रसंगी मनोगतात सांगितले. समारोपाप्रसंगी गावातील संघ स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान साकळीच्या सरपंच सौ. सुषमा पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य नूतनराज बडगुजर, भागवत रावते, संजय पाटील व सर्व कार्यकर्त्यांच्या सेवाभावी सहभागातून जेवण व नाश्त्याची  व्यवस्था करण्यात आली. तसेच आई अक्वा चे मालक बापू साळुंखे (साकळी) यांच्याकडून मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्येष्ठ स्वयंसेवक अंबादास नेवे, राजेंद्र नेवे, विकासोचे चेअरमन वसंत बडगुजर, संचालक सुनील नेवे, विशाल (बापू)पाटील, रामकृष्ण खेवलकर, स्वप्नील तायडे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच सूर्यभान बडगुजर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.