भारतीय समाज हिंदू स्वयंसेवक संघामुळे परदेशात एकजूट – विशाल शाह

0
चोपड्यात ‘पद्य रजनी’ चा अनोखा उपक्रम
चोपडा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतात समाजाभिमुख आणि संस्कृती जतनाचा घालून दिलेला कार्याचा कित्ता परदेशात हिंदू स्वयंसेवक संघ (एच.एस.एस.) तंतोतंत जोपासत आहे.त्यामुळे परदेशात देखील भारतीय हिंदू समाजाची एकजूट निर्माण झाली आहे.महान भारतीय संस्कृती संघाच्या विविध समारंभातून परदेशी मंडळीना आकर्षीत करीत असल्याचे प्रतिपादन अमेरीकेतील अटलांटा येथील निवासी,जॉर्जिया विभाग किशोर गट प्रमुख व भारतमाता शाखेचे कार्यवाह व चोपडा निवासी विशाल शाह यांनी रा.स्व.संघाच्या कार्यानुभवांबद्दल बोलतांना केले.
‘हाऊडी मोदी’ ने ट्रम्प प्रभावित
यावेळी शाह पुढे म्हणाले की,अमेरिकेत झालेल्या पन्नास हजारावरील भारतीयांच्या उपस्थितीतील ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमाच्या आयोजनाने व शिस्तबध्दतेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड प्रभावित झाले.मोदींच्या कामाचा आणि प्रतिमेचा करिष्मा पाहून ते आश्चर्यचकित होते.मोदी आणि ट्रम्प यांची प्रेषकांमधील दोन कि.मी.ची पायी फेरी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना काळजीची होती.पण नियोजनामुळे सहज पार झाल्याने शिस्तीचे कौतुकच झाले.या कार्यक्रमात मला स्वंयसेवक म्हणून काम करण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील गुजराथी वाडीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघ रचनेतील सांघिक व वैयक्तीक पद्य सादर करीत ‘पद्य रजनी’ हा अनोखा पहिलाच उपक्रम पार पाडला.भारतमातेच्या प्रतिमा पुजनाने पद्यरजनी व अनुभव कथन कार्यक्रमाला प्रारंभ झाला.यावेळी अवधुत ढबू,मनोज चित्रकथी, लक्ष्मण शेटी,सौरभ नेवे,प्रभाकर महाजन,महेंद्र शेटी,कृष्णा महाजन, नितीन वर्डीकर, यांनी पद्य सादर केली.पद्य रजनीचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ ने मजसी ने परत मातृभुमिला’ या कवितेने झाली.पद्य रजनीला संगितसाज विजय पालिवाल,मनोज चित्रकथी,सागर नेवे,कुशल गुजराथी,डॅा.नरेंद्र अग्रवाल यांनी चढविला.कार्यक्रमाचे निवेदन सौरभ नेवे यांनी केले.पद्यरजनीचा चोपड्यात पहिलाच प्रयत्न यशस्वी ठरला.जुन्या नव्या स्वयंसेवकांना एकत्रीत आणणारा ठरला.
याप्रसंगी जिल्हा संघचालक राजेश पाटील, तालुका कार्यवाह संदीप साळुंखे,शहर कार्यवाह मनोज विसावे,अरविंदभाई गुजराथी,संगीत शिक्षक वसंत मयूर यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.