भारतीय वायुसेनेत एअरमन पदाची भरती

0

         जिमाका-जळगाव, दि. 2 – भारतीय वायूसेनेमध्ये ग्रुप “एक्स व ग्रुप “वाय” ट्रेड करीता एअरमन पदाची भरती आहे. याकरीता उमेदवारांची नोंदणी 12 जानेवारी 2018 पर्यंत ऑनलाईन्‍www.airmenselection.cdac.in व www.carrerindianairforce.cdac.in  या वेबसाईट वर करण्यात येणार आहे. चाचणी परिक्षा 10 मार्च रोजी होणार आहे.

या भरती संदर्भातील जाहिरात 2 डिसेंबर, 2017 रोजीच्या एम्प्लायमेंट न्युज/ रोजगार समाचार मध्ये प्रसिध्द झालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 022-23714992 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.