भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस पदी सोमनाथ पाटील यांची निवड

0

भडगाव (प्रतिनिधी) :  भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव येथील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ शालिग्राम पाटील यांची जिल्हा चिटणीस म्हणून निवड जाहीर केली.

याबद्दल सोमनाथ पाटील यांचे माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, खा. उन्मेश पाटील, खा रक्षाताई खडसे, आ. संजय सावकारे, आ. चंदूभाई पटेल, महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्क प्रमुख किशोर काळकर, माजी आ. स्मिताताई वाघ, जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, डाॅ राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, पोपट भोळे, नवनियुक्त सरचिटणीस मधू काटे, पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.