भारतात कोरोनाने मोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड

0

नवी दिल्ली : देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील २४ तासांत सात हजार ४६६ नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1,65,799 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोव्हिड-19 मुळे गुरुवारी 175 लोकांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4,706 लोकांचा मृत्यू झाला आहे.मृत्यूंच्या बाबतीत भाराताने चीनलाही मागे टाकले आहे.  देशात 89,987 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत, तर 71,105 रूग्ण बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.

देशातील संक्रमणामुळे आतापर्यंत एकूण 4,706 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी महाराष्ट्रात 1,982 रुग्ण मरण पावले आहेत तर गुजरातमध्ये 960 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ही संख्या 321 आहे, दिल्लीत संक्रमणामुळे बळी पडलेल्या रूग्णांची संख्या 316 आणि पश्चिम बंगालमध्ये 295 आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये 180 आणि 197 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.