भातखंडे विद्यालयात पालक शिक्षक मेळावा संपन्न

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात नुकताच पालक शिक्षक मेळावा संपन्न झाला. यावेळी पालक शिक्षक मेळाव्याचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अशोक बाबूलाल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व पालक होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली  कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाज कसे चालते याबाबत सविस्तर माहिती उपस्थित पालकांना प्रास्ताविकातून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक  बी एन पाटील  यांनी करून दिली.

कार्यक्रम प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अशोक बाबुलाल पाटील, भास्कर मांगो पाटील ,अजाबराव साहेबराव पाटील ,गोरख उत्तम पाटील, पालक प्रतिनिधी रोहिदास पंढरीनाथ पाटील गुरुदास महाजन ,सुनील पाटील सह उपस्थित पालकांचा स्वागत व  सत्कार करण्यात आला.शेवटी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक बी एन पाटील यांना पुरस्कार प्राप्त झाला म्हणून त्यांचा विशेष सत्कार पालक व शिक्षकांतर्फे करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बी एन पाटील यांनी केले तर आभार एन यु देसले यांनी मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.