भातखंडे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन

0

 भातखंडे प्रतिनिधी : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय, प्रज्ञासुर्य,कायदेतज्ञ,विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन विश्वरत्न, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. कर्मवीर तात्या बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक आय जे पाटील, बी एन पाटील, सह-शिक्षक संदीप सोनवणे, संदीप पाटील, संजय पाटील, सोपान पाटील यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमापूजन व अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.