भातखंडे विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक  विद्यालय भातखंडे येथे ,२८ नोहेंबर,२०२० रोजी , क्रांतीसूर्य,थोर समाज सेवक, व स्री शिक्षणाचे प्रणेते, महात्मा ज्योतिबा फुले ,याची पुण्यतीथी  साजरी  करण्यात आली.विद्येची देवता, शारदा देवी, म. ज्योतिबा फुले व कर्मवीर, तात्या बाबा यांच्या प्रतीमेचे पूजन व माल्यार्पण विद्यालयाचे  मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले. यावेळी  स्कूल कमिटीचे अध्यक्ष अशोक बाबुलाल पाटील भास्कर मांगो पाटील अजाबराव साहेबराव पाटील गोरख उत्तम पाटील सह  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.सुत्रसंचालन बी एन पाटील यांनी आभार एन यु देसले यांनी मानले.तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.