भातखंडे परिसरात अवकाळी वादळाने दादर पीक जमीनदोस्त

0

भातखंडे (प्रतिनिधी) : भातखंडे सह परिसरात काल रात्री झालेल्या अवकाळी वादळाने प्रामुख्याने दादर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत असून याबाबत भातखंडे गावाजवळील दादर लागवडीचे क्षेत्र वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाले असून याबाबतची व्यथा येथील तरुण शेतकरी समाधान ध्रुवराज बोरसे यांनी  व्यक्त केली असून तलाठी यांनी तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी केली असून याबाबत भडगाव तालुक्‍याच्या नवनियुक्त कर्तव्यदक्ष तहसीलदार तृप्ती मॅडम यांनी विशेष लक्ष घालून भातखंडे व परिसरातील यात तळई रस्त्यालगत हिवद शिवारात देखील दादर हे पिक  अवकाळी वादळाने जमीनदोस्त झाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

तरी या बाबत भडगाव पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे  लोकप्रिय आमदार चिमणराव पाटील यांनी लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामा करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.