भातखंडे खुर्द येथे महिला शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

0

भातखंडे (प्रतिनिधी) १ जुलै कृषी दिनाच्या निमित्ताने भातखंडे खुर्द ता पाचोरा येथे कृषी सप्ताहाचे आयोजन माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने कृषी दिनानिमित्त कृषी विभाग व नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी सप्ताह १ जुलै ते ७ जुलै २०२० अंतर्गत कृषी दिन कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पूर्णपणे पालन करून कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम कृषी संजीवनी समिती भातखंडे खुर्द व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी उपस्थित महिलांचे थर्मल स्कॅनिंग करून कोविड -१९ बाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत महिला शेतकरी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कापूस पीक निरीक्षणे घेण्या सोबतच एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री जाधवसाहेब यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याचे स्मरण त्यांनी करून दिले डॉ. सुमितसिंग राजपूत, कडधान्य पैदासकार व तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव यांनी कडधान्य पीक संदर्भात तसेच कापूस पिकात कडधान्य पिकाचे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.संजीव पाटील तेलबिया पैदासकार संशोधन केंद्र, जळगाव यांनी कापूस पिकास संदर्भात बियाण्याची निवड अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच रासायनिक किटक संदर्भात मार्गदर्शन केले. वैभव सुर्यवंशी विषय विशेष तज्ञ कृषी अभियांत्रिकी तेलबिया संशोधन केंद्र जळगाव यांनी बी बी एफ यंत्राविषयी व त्याद्वारे होणारे फायदे तसेच ट्रॅक्टर अवजारे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. विलास सनेर बी डी ओ पंचायत समिती पाचोरा यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन व सेंद्रिय शेती या बाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी एन व्ही नयनवार उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा, संजय सोनवणे तंत्र अधिकारी, राजेंद्र एडके लेखाधिकारी, आर बी ढेपले कृषी अधिकारी , ईश्वर देशमुख कृषी अधिकारी,सरपंच गणेश वाघ, नितीन बोरसे ग्रामसेवक , पुष्पलता मनोज कुमावत- आशा सेविका , शारदा भगवान कुमावत , रेखाबाई गणेश वाघ वी सी आर एम सी सदस्य, महिला शेतकरी बचत गट, एस टी पाटील मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आर बी चौधरी , समूह सहाय्यक प्रदीप मराठे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाचोरा तालुका कृषी अधिकारी – अशोक जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन ईश्वर देशमुख- कृषी अधिकारी पंचायत समिती पाचोरा, यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भातखंडे खुर्दच्या कृषीताई- शारदा कुमावत यांनी महिला शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करून विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखवला तसेच ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य यांनी देखील परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.