भाजपाध्यक्षपदाची धुरा ‘या’ नेत्याकडे !

0

नवी दिल्ली :- नरेंद्र मोदी यांनी काल दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह 58 मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, मोदींच्या कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच भाजपाध्यक्ष अमित शाह यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे शाह यांचं खातेवाटप झाल्यानंतर भाजपाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमित शाह यांना केंद्रीय पद मिळाल्यास त्यांचे असलेले अध्यक्षपदाची खुर्ची एखाद्या विश्वासू नेत्यावर सोपवण्याची चिन्हं आहेत. मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणाऱ्या जे पी नड्डा यांच्याकडे यंदा कोणतंही मंत्रालय सोपवण्यात आलेलं नाही. त्यामुळे जे पी नड्डा यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. जे पी नड्डा हे हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर खासदार आहेत. ते भाजपच्या संसदीय बोर्डाचाही भाग होते. अमित शाह 2014 पासून भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी यंदा गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला.

Leave A Reply

Your email address will not be published.