भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन

0

धुळे – जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार व भाजपाचे पूर्व प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया आज बुधवारी निधन झाले आहे. ते ७१ वर्षाचे होते.  पुणे येथे आपल्या मुलाकडे आकस्मिक निधन झाले असून त्यांच्यावर पुणे येथेच १० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

माजी आमदार धरमचंद चोरडिया हे १९७७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता होते. १९७८-८१ या काळात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होती. १९८२ साली ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय चिटणीस झाले. त्याकाळात त्यांनी राष्ट्रीयस्तरावर केलेल्या कामाची दखल घेत त्यांना भाजपात प्रदेश चिटणीसपद मिळाले. त्यानंतर ते प्रदेश संघटनमंत्री होते.

नगरसेवक – धरमचंद चोरडिया १९८४ ते ९० याकाळात धुळे पालिकेचे सदस्य होते. त्यानंतर ते १९९२ साली जूनमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती.

 

आणीबाणी आणि मराठवाडा नामांतर आंदोलनात कारावास – आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने कारावास भोगला होता. तसेच मराठवाडा नामांतर आंदोलनातही कारावास भोगला होता. ते जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदावरही होते.

Leave A Reply

Your email address will not be published.