भाजपने पक्षप्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर दिली होती ; राष्ट्रवादीच्या आमदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट

0

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खळबळजनक दावा करत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. भाजपने पक्ष प्रवेश करण्यासाठी मला १०० कोटींची ऑफर दिली होती. पण, ती ऑफर मी धुडकावली, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख देखील केला आहे. शिंदे यांच्या या गौप्यस्फोटमुळे राजकीय वर्तुळाता चर्चेला उधाण आले आहे.

 

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी मला मंत्रीपदाची ऑफर दिली होती. यासाठी पोटनिवडणुकीत १०० कोटींचा खर्च करण्याचे अमिषही त्यानी दाखवले होते असे शशिकांत शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

 

भाजपने दिलेली ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती. यापुढेही अशा ऑफर मी नाकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना सरकारच्या काळात भाजपने अनेक नेत्यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या असेही शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.