भाजपचे जळगाव जिल्हा परिषद सदस्य सहलीवर !

0

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना साेमवारी ट्रॅव्हल्सने सहलीसाठी रवाना केले. बहुमत असतांना संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपने सर्व सदस्यांना एकत्रित बाेलवून सहलीसाठी रवाना केले आहे. यात महिलांसह पुरूष सदस्यांचा देखील समावेश आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी काही नाराज सदस्य विराेधकांच्या गळाला लागू शकतात. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी झाली असली तरी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शिवसेना सोबत घेण्यात भाजपला यश आले आहे. दगाफटका टाळण्यासाठी भाजपने आपल्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी सहलीवर पाठविले आहे. त काही सदस्य अनुपस्थित असून त्यांच्याशी संपर्क सुरू अाहे. जे सदस्य उपस्थित हाेते त्यांना साेमवारी सकाळी एका ट्रॅव्हल्सने रवाना करण्यात अाले.

Leave A Reply

Your email address will not be published.