भडगाव येथे शांतता कमिटीची बैठक

0

भडगाव;- येथे रमजान ईद निमित्त भडगाव पोलिस स्टेशनतर्फे आज दि.14रोजी दुपारी एक वाजता शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
16 रोजी शनिवारी रमजान ईद आहे.. ईद उत्साहात साजरी व्हावी व शांततेत पार पडावी यासाठी शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली. तसेच शहरातील समस्यांवर चर्चा केली. या वेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी सलोख्यया विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन , नगरसेवक अमोल नाना पाटील, नगरसेवक प्रशांत पवार , संजय सोनवणे, रमेश कांबळे, जकीर कुरेशी सोनू शेख, राजू शेख, ईसाक मलिक, ईकाबल शेख कादर बेग मिर्झा, शंकर मारवाडी , चंदू मालपुरे, आदि उपस्थित होते. या वेळी सहाय्यक पोलिस- निरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस उपनरीक्षक- आनंद पठारे , पो. का. लक्ष्मण पाटील, दीपक सुरवाडे, पो .का .नितीन रावते, ईश्वर पाटील, विस्वास देशमुख, गायकवाड, सुनील पाटील आदि उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.