भडगाव तालुक्यात ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका ; मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर

0

भडगाव (प्रतिनिधी) : एप्रील ते जुन २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित  १५६६ जुलै २०२० ते डीसेंबर  २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापीत  ग्राम पंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केलेला आहे. भडगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या एकुण ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असुन हा मतदार यादयांचा कार्यक्रम लागलेला आहे. २५ सप्टेंबर २०२० विधानसभेची मतदार यादी ग्राहय धरण्यात आली आहे.हीच यादी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निवडणुक आयोगाने  ग्राहय धरलेली  आहे. आता संबंधित ग्रामपंचायतींची प्रभागनुसार मतदार यादी तयार करण्याचे भडगाव तहसिल निवडणुक प्रशासनाने नियोजन सुरु केलेले आहे. यासाठी संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांची याकामी नियुक्ती करण्यात आली आहे. आता ग्रामस्थांना प्रतिक्षा आहे ती गावाच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची.

याबाबत माहिती अशी कि, भडगाव तालुक्यात मुदत संपलेल्या एकुण ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाने यापुर्वीच जाहिर केल्या होत्या. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी  प्रभाग रचना व प्रभागांसाठी जागांचे आरक्षण यापुर्वीच निवडणुक प्रशासनाने काढलेले होते. जिल्हाधिकार्यांच्या नमुना अ नोटीफिकेशन ग्रामपंचायत निहाय दि. २/११/२०२० रोजीच प्रसिद्ध केलेले आहे.  कोरोनाच्या पाश्वभुमिवर राज्य निवङणुक आयोगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम स्थगीत करण्यात आलेला होता.

या अनुषंगाने आता  ग्रामपंचायत  सार्वञिक निवडणुकांसाठी दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेली  मतदार यादी वापरण्यात येत आहे.मतदार यादींचा हा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केलेला आहे. तो  कार्यक्रम असा आहे. मतदार यादी ग्राहय धरण्याचा दि. २५/९/२०२० शुक्रवार, प्रभाग निहाय  प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दि. १/१२/२०२० मंगळवार, हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी दि. १/१२/२०२० मंगळवार ते दि. ७/१२/२०२० सोमवार पर्यंत , प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी दि. १०/१२/२०२० गुरुवार.असा कार्यक्रम असल्याची माहिती भडगाव तहसिल प्रशासनाने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.