भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट मदत द्यावी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव तालुक्यात काल तसेच मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यiचे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. त्यासाठी केलेला पूर्ण खर्च व मेहनत वाया गेली असून शेतकरी आणि त्यांचेवर अवलंबून असणारे सर्व लोक प्रचंड हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकपेऱ्यानुसार तात्काळ रोख स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी तहसिलदार मुकेश हिवाळे यांना भडगाव तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळणेकामी शासनाकडे तात्काळ मागणी करण्यात यावी. यापूर्वी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या भरपाईची मदतही तात्काळ मिळावी. तसेच तालुक्यात झालेल्या रस्ता निर्मितीमुळे संबंधित विभागाने सांडवा न काढल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुढघाभर पाणी तुंबल्याने पूर्ण पिक वाया झाले असून शेतांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांचेही पंचनामे करण्यात यावेत. संबंधित मागण्यांचा योग्य विचार न  झाल्यास भडगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे नमूद आहे.

याप्रसंगी जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, माजी जि.प. सदस्य श्रावण लिंडायत, युवा मोर्चा अध्यक्ष किरण शिंपी, महेंद्र ततार, सचिन पाटील, बन्सीलाल  परदेशी, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, कुणाल पाटील, रतिलाल पाटील, पंढरीनाथ मराठे, विशाल चौधरी, आबा पाटील, दत्तात्रय पाटील, संजय बाग, पांडुरंग मराठे, सुधाकर चव्हाण, यादव मराठे, सुभाष मोरे, सुरेश मराठे, सुर्यभान वाघ, सुरेश नरवाडे, वाल्मीक वाघ इ. पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.