भडगाव क्रिडासंकुलाचे काम वाऱ्यावर ; पूर्ण सुविधांची मागणी

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव येथे पाचोरा रस्त्यावर ३ कि. मी. अंतरावर क्रिडासंकुलाचे काम सुरु करण्यात आले होते. माञ हे काम अर्धवट स्थितीत असुन याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. क्रिडासंकुलाचे काम वार्यावर असुन तालुक्यातील खेळाडू आज या पासुन वंचित आहेत. तरी शासनाने तात्काळ या क्रिडासंकुलाचे काम पुर्ण करावे. खेळाडूना सोय सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात अशी मागणी भङगाव तालुक्यातील क्रिडाप्रेमी मंडळीतुन होत आहे.

याबाबत माहीती अशी कि, भडगाव तालुक्यासाठी क्रिडासंकुल मंजुर करावे. यामुळे खेळाडुना वाव मिळेल. या मागणीनुसार  तत्कालीन आमदार डॉ. सतीष पाटील यांचे कार्यकाळात भडगाव येथे क्रिङा संकुलाचे कामास मंजुरी मिळाली. या  क्रि डासंकुल कामाचे २८ डीसेंबर २००८ साली भुमिपुजन करण्यात आले होते. भडगाव शहरापासुन ३ कि मी अंतरावर टोणगाव शिवारात गट नं. २३१ मध्ये हे क्रिडा संकुल उभारणी करण्यात आली आहे. या जागेचे सपाटीकरण करुन या कामास सुरुवात झाली होती. यात मंजुर सुविधा अशा आहेत. २०० मिटरची धावणपट्टी, व्हाॅलीबाॅल, कबङ्ङी, खोखो, एक मैदान, जिम हाॅल, प्रसाधन गृह, पिण्याचे पाण्याची टाकी, आदि कामे सोयी सुविधा मंजुर होत्या. माञ आजची स्थिती अशी आहे. जीम हाॅलचे काम पुर्ण झाले आहे. २०० मीटर धावणमार्ग अपुर्णच आहे. कोणतेही मैदान तयार नाही. लाईट व्यवस्था नाही. जीम हाॅलला दरवाजे नव्हते. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी स्वखर्चाने या हाॅलला दरवाजे, शटर बसवुन दिलेले आहेत. अशी माहिती तालुका क्रिङासंयोजक जी. जे. पाटील यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली. तालुका क्रिङा संयोजक जी जे पाटील, नितीन पवार, एस बी पाटील, महेंद्र पाटील, सतीष पाटील यांचे प्रयत्नातुन खो खो व कबङ्ङी क्रिङांगण तयार करण्यात आले आहे.

येथे कुस्ती व कराटे स्पर्धा घेण्यात येतात.सहा महिन्यापुर्वी क्रिङा संकुलास क्रिङा संचालक, जिल्हा क्रिङा अधिकारी यांनी भेट दिली होती. काय काय सुविधा केल्या पाहीजेत याचा आढावा घेतला होता. क्रिङा संकुलास वाॅलकंपाउंङ आवश्यक आहे. पाणी व लाईटची व्यवस्था व विविध क्रिङाॅगणे तयार करणे. याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. माञ अदयापही शासनाकङुन काहीच दखल घेतलेली नाही. तरी तालुक्याचे आमदार यांनी याकङे लक्ष दयावे. शासनाने तात्काळ सौयी सुविधा मंजुर करुन दयाव्यात. यामुळे खेळाङुंना वाव मिळेल. भङगावचे नावलौकीकात भर पङेल. राज्यासह सर्वञ चमकदार कामगिरी करण्यास खेळाङुंना संधी मिळेल. अशी अपेक्षा आहे.आजही खेळाडु सुविधा नसुनही क्रिडासंकुलात खेळतांना दिसतात.

Leave A Reply

Your email address will not be published.