भडगावात पुढील तीन दिवस स्वंयस्फुर्तीने जनता कर्फ्यु

1

भडगाव (प्रतिनीधी) :तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असल्याने पुढील तिन दिवस दि.२७,२८,२९ रोजी स्वंयस्फुर्तीने जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय व्यापारीच्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी वर्गाची बैठक सायंकाळी शिवसेना कार्यालयात घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थानी आ.कीशोर पाटील होते.

यावेळी व्यापारी असोशियनचे दिलीप भंडारी, मेडीकल्स असोशियन्स अध्यक्ष सुरेश भंडारी, मनोहर चौधरी, डाॕ. प्रमोद पाटील, शिवदास आप्पा महाजन, जे. के. पाटील, संतोष महाजन, डाॕ. निलेश पाटील, प्रविण येवले, छोटु शेठ जैन, शैलेश तोतला, यांच्या सह शहरातील व्यापारी वर्ग उपस्थित होते.
भडगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या अधिकाअधिक वाढत आहे. सुरुवातील शहरात कोरोनाने पाय पसरवले तर मागिल दोन दिवसापासुन ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. काल तालुक्यात २६ रुग्ण आढळले होते. यात गोंडगाव येथे तीन, वंसतवाडी ५, आमडदे ११ तर शहरात ७ रुग्ण आढळले तर आज पुन्हा तालुक्यात २१ रुग्ण आढळुन आले. यात वरखेड १६ तर शहरात ५ रुग्ण आढळून आले. दोनच दिवसात ४६ बाधित रुग्ण आढळुन आल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले. या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस शहरात स्वंयस्फुतीने जनता कर्फ्यु पाळावा असे व्यापारी वर्गाच्या बैठकीत निर्णय आला.
उपस्थित व्यापारी वर्गाला मार्गदर्शन करताना आ. कीशोर पाटील म्हणाले की, कोरोनाने सुरुवातीला शहरात पाय पसरले आता ग्रामीण भागात त्याचा फैलाव होत आहे. आज शहरात शुक्रवारच्या आठवडे बाजारातील चित्र हे मनात धडकी भरवणारे होते. त्यामुळे कोरोनाच्या संकटातुन बाहेर पडत नाही तोपर्यत भडगाव चा शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहील तसेच भाजीपाला विक्रीसाठी गिरणा नदी पात्रातील शाळेच्या मैदानावर व्यवस्था करण्याची सुचना प्रशासनास केली आहे. जनता कर्फ्यु मुळे रीलीफ मिळण्यास मदत होईल. यामुळे पुढील तिन दिवस २७ जुन ते २९ जुन पर्यत स्वयम स्फुर्तीने जनता कर्फ्यु पाळण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे असे या वेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले .

1 Comment
  1. महेंद्र पाटील says

    निवडून व्यापारी बोलावले वाटते,आणि भडगावत एवढेच व्यापारी आहेत का

Leave A Reply

Your email address will not be published.