भंडारा घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून दु:ख व्यक्त

0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात रुग्णालयाच्या नवजात बालक दक्षता विभागात लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलंय.

“महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत” अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.


तर गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. “या घटनेबद्दल शब्दांत दु:ख व्यक्त करणे अशक्य आहे. बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या दुखद संकटाच्या प्रसंगात देव त्यांना शक्ती देवो”, अमित शहा म्हणाले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.