बोरी धरण भरले १०० टक्के !

0

धरणाचे दोन गेट उघडले

पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा तालुक्यातील संजीवनी समजले जाणारे तामसवाडी बोरी धरणच्या पाणलोट भागात जोरदार पाऊस झाल्याने आज ६ रोजी सकाळी ११ वा बोरी धरण १०० टक्के भरले आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आज १२ वाजेच्या सुमारास धरणाचे दोन गेट ०,१५ पर्यंत उघडण्यात आले असून त्यातून ९०३ इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

त्यामुळे नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी बोरी नदी काठावरील टोळी, तरडी, मो, पिंप्री, नागेश्वर, विचखेडासह पुढील गावानां ही दवंडी द्वारा सुचित करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.