बोदवड येथे विरोधात अर्ज फाटे करीत असल्याच्या कारणावरून एकास लोखंडी दांड्याने मारहाण

0

बोदवड – शहरातील बागवान मोहल्ल्यातील पाण्याच्या टाकीजवळून दि.२६ मंगळवार रोजी रात्री ८ च्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी जात असलेल्या नईम खान युनुस खान बागवान वय (२७) यास तू आमच्या विरूध्द विविध अर्ज फाटे करतो या कारणावरून डोक्याच्या मागील व डाव्या बाजूस लोखंडी धारदार वस्तूने मारहाण करीत गंभीर दुखापत केली.

याप्रकरणी नईमखान युसुफ खान यांच्या फिर्यादी वरून शे.अस्लम बागवान,शे.हारुन बागवान,शे.रहीम बागवान,शे.दानिश बागवान,शे.सईद बागवान,शे.इरफान बागवान,शे.साजिद बागवान या सात आरोपी विरूध्द बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास महाजन करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.